

कळवा : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज मुंब्रा येथील दारूल फलाह मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी निषेध आंदोलन केले. बांगलादेशमधील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्या देशातील हंगामी सरकारवर सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.