विजेवरील वाहनांचा वापर करा; आदित्य ठाकरे यांचे आवाहन

अदाणी इलेक्ट्रिसिटीची इलेक्ट्रिक मोटार रॅली
Aditya Thackeray
Aditya Thackeraysakal media
Updated on

मुंबई : स्वच्छ पर्यावरणासाठी राज्य सरकार (mva Government) अनेक उपक्रम राबवीत असून नागरिकांनी विजेवरील वाहनांचा (Electrical vehicle) जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीतर्फे (Adani electricity) आयोजित इलेक्ट्रिक मोटारींच्या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Aditya Thackeray
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 405 नव्या रुग्णांची भर; तर 6 जणांचा मृत्यू

शहरात वायूप्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ रहावे यासाठी जनजागृतीच्या हेतूने अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि ऑटोकारतर्फे आज विजेवर चालणाऱ्या तीस मोटारींची रॅली आयोजित करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्सवरून सुरु झालेली ही रॅली थेट मुंबईच्या टोकाला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आरे कॉलनीमार्गे पूर्व उपनगरांमधील कांदळवनाच्या व खाडीपट्ट्यातून 110 किलोमीटर अंतर कापून गेली. याप्रसंगी अदाणी ग्रूप च्या जीत अदाणी यांनीही रॅलीला शुभेच्छा दिल्या.

मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राची मोठी वाढ होत आहे. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जनजागृतीसाठी अशा रॅली मुंबई-पुणे किंवा मुंबई-कोल्हापूर दरम्यानही आयोजित कराव्यात, असे श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. परंपरागत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषण होते, त्याऐवजी विजेवर चालणाऱ्या गाड्या वापरल्यास पर्यावरण स्वच्छ रहाते. ही बाब लोकांवर ठसविण्यासाठी अदाणी व ऑटोकार तर्फे ही मोहीम आयोजित करण्यात आल्याचे अदाणी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ कंदर्प पटेल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com