शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत आव्हाडांनी दिली महत्त्वाची माहिती

तुम्हाला माहिती आहे का 'या' फोटोमागची कहाणी
Sharad-Pawar-Jitendra-Awhad
Sharad-Pawar-Jitendra-AwhadTwitter
Summary

तुम्हाला माहिती आहे का 'या' फोटोमागची कहाणी

मुंबई: टाटा मेमोरियल रुग्णालय (Tata Hospital) हे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यारं महत्त्वाचं हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये केवळ राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरने (Cancer) ग्रासलेले रूग्ण येतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. या नातेवाईकांची राहण्याची सोय नसल्याने आणि त्यांना खासगी निवासस्थान (Lodging) परवडत नाही. मग नाईलाजाने त्यांना मुंबईतील (Mumbai) फुटपाथवर किंवा आडोशाला आश्रय घ्यावा लागतो. पण आता या रुग्णांच्या नातेवाईकांना 'म्हाडा'कडून (MHADA) घरे दिली जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ही घरं याच आठवड्यात दिली जातील, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतचे तीन फोटो पोस्ट (Viral Photo Post) करून त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. (MVA Minister Jitendra Awhad Tweets Photo with NCP Chief Sharad Pawar Informs about MHADA Housing Updates)

Sharad-Pawar-Jitendra-Awhad
युद्धनौका त्रिखंडवरील ऑक्सिजन मुंबईत दाखल

"काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला... कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले की साहेब घरे तयार आहेत. चाव्यादेखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला. मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठीक आहे. या आठवड्यात हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत", असं ट्विट आव्हाड यांनी केलं. या पोस्टसोबत त्यांनी साहेब आणि ऊर्जास्त्रोत हे दोन हॅशटॅगही ट्वीट केले.

'म्हाडा'तर्फे देण्यात येणाऱ्या घरांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलला सोपवण्यात येणार आहेत. पुढील काही दिवसात यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या आठवड्यातच टाटा मेमोरियल कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे मिळणार आहेत. ३०० चौरस फूटांचे हे १०० फ्लॅट आहेत. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच तसा कारार करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com