माझं कुटुंब,माझी जबाबदारी अभियानातून लोकप्रतिनिधींचा काढता पाय; आशा स्वयंसेवकांकडे ढकलली जबाबदारी

मिलिंद तांबे
Monday, 28 September 2020

  • ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानातून अनेक लोकप्रतिनिधींना जबाबदारी झ़टकली आहे.
  • कोणतीही साधन सामग्री न देता आशा स्वयंसेविकांच्या डोक्यावर हे काम देण्यात आले आहे
  • राज्यभरातील आशा स्वयंसेविकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  

मुंबई : ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानातून अनेक लोकप्रतिनिधींना जबाबदारी झ़टकली आहे. त्यामुळे कोणतीही साधन सामग्री न देता आशा स्वयंसेविकांच्या डोक्यावर हे काम देण्यात आले आहे, असा आरोप करत राज्यभरातील आशा स्वयंसेविकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  

बाजारात व्हेंटिलेटरचा तुटवडा; दर्जा योग्य नसल्याने नवी मुंबई महापालिकेची खरेदी रखडली

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या कालावधीत  गृहभेटी देण्यासाठी आरोग्य फथके तयार करून त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा स्वयंसेविका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना दिलेले दोन स्वयंसेवक असतील, असे सरकारकडून निश्चित करण्यात आले होते. मात्र अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी दोन स्वयंसेवक दिलेले नाहीत. त्यामुळे पथके तयार झालेली नाहीत. आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव देण्यास सक्ती केली जात जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी केला आहे. 
अनेक आशा स्वयंसेविकांकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने केलेल्या कामाचे रेकॉर्ड त्या ठेऊ शकत नाहीत. ज्या ठिकाणी मोबाईल रेंज जात नाही, त्या ठिकाणी मोहिमेसाठी छापिल फॉर्म पुरपवण्याची सूचना केली आहे, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, समितीने म्हटले आहे.  आशा स्वयंसेविकांना कोठेही स्टीकर, पेन, टी शर्ट, टोपी, बॅच,हातामोजे, मास्क, सॅनिटायझर देण्यात आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील पूरग्रस्तांना दहा हजारांचे मदत करा, भाजपची मोर्चाद्वारे मागणी

एका पथकाला दररोज 50 घरांना भेटी देऊन ऑक्सिजन तसेच दिर्घकालीन आजार तपासण्यास सांगण्यात आले आहे. मात्र पथके तयार नसल्याने हे काम करता येणे शक्य नाही. शिवाय एका  गृहभेटीला सुमारे 20 मिनिटे लागत असल्याने दिवसातील 12-13 तास काम करणे शक्य नसल्याचे ही समितीचे सलिम पटेल यांनी  सांगितले.
गटप्रवर्तकांना मासिक 625 रूपये दैनिक भत्ता देण्यात यावा, आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्कतकांचे वाढवण्यात आलेले वेतन 1 ऑक्टोबरपासून देण्याची मागणी ही समितीकडून कऱण्यात आली आहे.  गटप्रवर्तकांना दैनंदिन खर्चासाठी दरमहा 300 रूपये देण्यात यावेत , तसेच आशांना स्टेशनरीसाठी दरमहा 25 रूपयांऐवजी 100 देण्याची मागणी ही करण्यात आली असल्याचे समितीच्या पदाधिकारी सुवर्णा कांबळे यांनी सांगितले. 

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family my responsibility to get peoples representatives out of the campaign