‘माझी मुंबई, माझी कॉंग्रेस'! BMC निवडणूकीसाठी कॉंग्रेसचा कृती आराखडा तयार

‘माझी मुंबई, माझी कॉंग्रेस'! BMC निवडणूकीसाठी कॉंग्रेसचा कृती आराखडा तयार

मुंबई, : मुंबई महानगर पालिकेसाठी कॉंग्रेस आता संपुर्ण ताकदिने मैदानात उतरणार आहे.त्यासाठी ‘माझी मुंबई, माझी कॉंग्रेस’हे 100 दिवसांचे अभियान सुरु करण्यात येणार आहे.यात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी 100 किलोमिटरची पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोशल मिडीयावरही भर देण्यात येणार आहे.मुंबईच्या मुद्यांवर आक्रमक होण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला असून त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेस मधील मुंबईतील संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी महानगर पालिका निवडणुक स्वतंत्र लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे.त्यासाठी प्रभाग स्तरां पर्यंत पक्षांची बांधणी करण्यात येणार आहे.मुंबईत 227 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात किमान 1 संपर्क कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याच बरोबर प्रभाग स्तरा पर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे.तसेच,मुंबई समिती वरील पदाधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.प्रभाग पातळीवर संपर्क कार्यालया उभे राहील्यास नागरीकां पर्यंत पोहचणे शक्य होणार आहे.तसेच,नागरीकांनाही त्यांच्या अडचणीसाठी कार्यालया येता येणार आहे.त्यासाठी हे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

‘प्रजास्ताक दिन 26 जानेवारी पासून 100 दिवसांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.यात प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दुरु करुन त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण केला जाईल’.असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.
राजकीय प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापर कसा करावा हे भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकी पासून दाखवून दिले आहे.देशातील कोणताही राजकीय पक्ष याबाबतीत त्यांच्या आसपासही पोचू शकला नाही.मात्र,आता मुंबई कॉंग्रेसने समाजमाध्यमांचा वापरही करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याच बरोबर प्रवक्त्यांनी किमान आठवड्यातून 1 वेळा पत्रकार परीषद घेऊन मुंबईतील मुद्यांवर आवाज उठवावा तसेच समाजमाध्यमांवर सक्रिय राहाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेते शिवसेनेची सत्ता आहे.तर,कॉं्रगेसच मुंबई महानगर पालिकेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करत अाहे.त्यामुळे यापुढे मुंबईतील प्रश्‍न अधिक आक्रमक पणे मांडले जाण्याची शक्यता आहे.शिवसेना सध्या मुंबई पातळीवर कॉंग्रेसची पंगा घेताना दिसत नाही.मात्र,येत्या काळात शिवसेनेकडून प्रतिउत्तर दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

My Mumbai my Congress Congress prepares action plan for BMC elections

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com