Sairaj Kendre : मायरा व साईराजच्या देवबाप्पा गाण्याने पार केला दहा लाख व्ह्यूजचा टप्पा

अलिबागच्या नयनरम्य निसर्गात शूट झाले गाणे
mayra
mayrasakal

पाली - प्रसिद्ध बालकलाकार मायरा वैकुळ आणि 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या रिल्समुळे सध्या चर्चेत आलेला साईराज केंद्रे या चिमुकल्यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेले 'देवबाप्पा' हे नवीन गाणे नुकतेच भेटीला आले आहे. या गाण्याला आत्तापर्यंत 10 लाख पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अलिबागसारख्या नयनरम्य ठिकाणी हे गाणे चित्रित झाले आहेत.

अलिबाग तालुक्यातील पोयनाड जवळील कुसूंबळे गाव व आसपासच्या परिसरातील गावांमध्ये हे शूटिंग करण्यात आले आहे. कौलारू घरे, भात शेती व डोलणारे भाताची रोपे असे निसर्गरम्य वातावरणात हे शूटिंग झाले. या गाण्यात टाईमपास सिनेमातील मलेरिया दादूस पनवेल येथील अभिनेते जयेश यांचाही समावेश आहे. 'ओढ तुझी लागली साऱ्या जगाला...लवकर ये बाप्पा तू घराला' असे या गाण्याचे बोल असून दिया वाडकर, हर्ष भोईर आणि स्नेहा महाडिक यांनी हे गीत गायले आहे.

mayra
J & K SI Recruitment Scam : देशभरात 33 ठिकाणांवर CBI ची छापेमारी

प्रवीण कोळी आणि योगिता कोळी हे गीतकार आणि संगीतकार आहेत. कोळीवूड प्रोडक्शन निर्मित या गाण्याचे निर्माते, दिग्दर्शक प्रवीण कोळी आहेत. 'एका बाप्पाच्या मुर्तीमुळे जर सर्व समाज एकत्र येत असेल तर बाप्पा तू खरच लाखात एक आहे' असा महत्त्वपूर्ण संदेश या गाण्यातून दिला आहे. कॉन्सेप्ट, स्टोरी आणि स्क्रीन प्ले संदेश कोळी, अक्षय गोरे यांचे आहे. अंकिता राऊत, भरत जाधव, नलिनी मुंबईकर, दिशा गिरी, जयेश चव्हाण, भावेश चव्हाण, विक्रांत मुंबईकर यांच्याही भूमिका आहेत. प्रवीण कोळी यांच्या यूट्यूब चॅनलवर गाणे पाहता येईल. अलिबाग तालुक्यात शूटिंग करतांना सर्वच कलाकारांनी धम्माल मस्ती केली.

mayra
Raigad : मुरूड किनाऱ्याच्या सुशोभीकरणाला गती

अलिबाग येथील नयनरम्य निसर्ग व सागरी किनारा चित्रपट सृष्टीला नेहमीच आकर्षित करतो. आत्तापर्यंत येथे अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे. येथे चित्रीकरण करतांना खूपच मज्जा येते. शूटिंग ला जाईपर्यंत मी आजारी होतो. पण त्या सेटवर गेल्यावर बाप्पाच्या आशीर्वादाने एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारली, त्यानंतर मला जाणवलं पण नाही मी आजारी होतो. असे जयेश चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com