Mysterious Incident Sakal
मुंबई
Superstition Case : विधिवत विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा मंदिरात परतल्या; दैवी चमत्कार, की मानवी हस्तक्षेप..?
Mysterious Incident : विसर्जित मूर्ती मंदिरात परतल्याने गावकऱ्यांमध्ये गोंधळ आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. हा प्रकार चमत्कार की मानवी हस्तक्षेप, याबद्दल मतमतांतरे दिसत आहेत.
किन्हवली : जीर्ण व भग्न पावलेल्या मूर्ती विधिवत विसर्जन करून त्या जागी मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने नव्याने मुर्त्या प्रतिष्ठापना करायची लगबग सुरू असतानाच आठवडाभरापूर्वी विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा एकदा मंदिरात परतल्याने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. हा प्रकार घडल्यापासून मंदिर परिसरात बाबा बुवांची रेलचेल सुरु झाली आहे. हा दैवी चमत्कार, की मानवी हस्तक्षेप या वरून परिसरात विविध मत मतांतरे बघयायला मिळत आहेत.

