Keep It Up : नायर रुग्णालयाने पार केला 100 प्लाझ्मा दात्यांचा टप्पा; दात्यांमध्ये डॉक्टरांचा सर्वाधिक सहभाग

Keep It Up : नायर रुग्णालयाने पार केला 100 प्लाझ्मा दात्यांचा टप्पा;  दात्यांमध्ये डॉक्टरांचा सर्वाधिक सहभाग

 मुंबई - नायर रुग्णालयात 100 व्या प्लाझ्मा दानाची नोंद करण्यात आली आहे. प्लाझ्मा दानाबाबत आता हळुहळु जागरूकता वाढत असताना अधिकाधिक बरी झालेले रुग्ण इतर गंभीर आजार झालेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत असल्याचे डॉक्टर्स सांगतात. कोरोनापासुन बरे झालेलया रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढणार्या प्रतिपिंडे तयार होतात. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेतला असुन यामध्ये डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. 

मुंबईत प्लाझ्मा दानासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. तीन महिन्यानंतर नायर रुग्णालयात शुक्रवारी 100 वा प्लाझ्मा दान पार पडले. डॉ. आंजनेय आगाशे हे 100 वे प्लाझ्मा दाते ठरले. डॉ. आगाशे यांचे संपुर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. त्यात त्यांनी आपल्या वडीलांना ही गमावले. याच जिद्दीतून डॉ. आगाशे यांनी आतापर्यंत तिसर्यांदा प्लाझ्मा दान केला आहे. दरम्यान, आयसीएमआर चाचणीचा एक भाग म्हणून, रुग्णालयातील 40 हून अधिक रुग्णांमध्ये प्लाझ्माचे संक्रमण करण्यात आले आहे. 

एखादा रुग्ण बरा होऊन प्रत्येक पंधरवड्यातून एकदा प्लाझ्मा दान करू शकतो. त्यानुसार, डॉ. आगाशे यांनी नायर रुग्णालयात जाऊन शुक्रवारी तिसर्यांदा प्लाझ्मा दान केला. नायर रूग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले की, बरे झालेल्या रूग्णांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण मोजण्यासाठी ते एक सीएलआयए हे तंत्र वापरत आहेत. आयसीएमआर चाचणीचा भाग म्हणून प्लाझ्मा थेरपी सुरू करणारे नायर हे शहरातील पहिले रुग्णालय ठरले आहे. पालिकेने 17 एप्रिलला प्लाझ्मा काढण्यासाठी एफेरेसिस मशीन खरेदी केली आहे. 

स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने 100 दात्यांपर्यंत पोहचण्यास आम्हाला यश मिळाले आहे असे ही डॉ. शास्त्री यांनी सांगितले. दात्यांच्या समुपदेशनासाठी पालिकेने एप्रिलमध्ये कोविड योद्धा आणि नंतर जूनमध्ये मुंबई धडकन या स्वयंसेवी संस्थेशी करार केला. कोविड योद्धाचे प्रमुख डॉ. स्वप्निल पारीख म्हणाले, “लोकांना समजवून सांगण्याबाबत काही अडचणी आहेत. आम्हाला पात्र दाते शोधण्यासाठी देणगिची आवश्यक आहे. 

डॉ. पारीख हे महाराष्ट्र सरकारबरोबर प्लाझ्मा दात्यांच्या शोधार्थ काम करत आहेत. इतर आजार असलेल्या, गर्भधारणेचा इतिहास किंवा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक दान करण्यासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांना शोधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी तयार करायचे हे खुप कठीण काम आहे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com