
नालासोपारा: दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) देण्यास विलंब केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी नालासोपारा येथील एका शाळेत गोंधळ घालून तोडफोड केली. यावेळी त्यांनी शाळेच्या महिला संचालिकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.