मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवर जाऊ नका; आता जावं लागणार 'नाना शंकरशेठ टर्मिनस'वर

मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवर जाऊ नका; आता जावं लागणार 'नाना शंकरशेठ टर्मिनस'वर

मुंबई : मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते आणि खासदार अरविंद सावंत यांना पत्राद्वारे दिली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं विधिमंडळात मंजूर करुन केंद्र सरकारकडं पाठवला होता. त्याबाबत काय निर्णय झाला याची माहिती खासदार सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विचारली होती. त्याच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे पत्र खासदार अरविंद सावंत यांना पाठवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरु असून सर्व संबंधित विभागांचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

काय म्हणालेत अरविंद सावंत : 

अरविंद सावंत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणालेत की, "मुंबईच्या विकासात नाना शंकरशेठ यांचं मोलाचं योगदान आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनस स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी फार जुनी आहे आणि त्याला आधीच उशीर झाला आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला आहे त्यामुळे केंद्र सरकारकडून याबाबत विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही. स्वतः केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपण याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचं उत्तर देखील आलं आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईतील मुंबई सेंट्रल टर्मिनस स्थानकाचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस करण्यात येईल असा विषावर अरविंद सावंत यांनी बोलून दाखवला.  

कोण होते नाना शंकरशेठ:

नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ ला मुंबईजवळच्या मुरबाडमध्ये झाला होता. नाना शंकरशेठ हे अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी होते. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला होता. सार्वजनिक कामांसाठी हे पैसे त्यांनी खर्च केले होते. १८४८ मध्ये नाना शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती. सती प्रथेला बंदी घालण्याच्या कायद्याला त्यांचा पाठिंबा होता. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. जे.जे. हॉस्पिटल सुरु होण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी २०१७ मध्ये लोकसभेत मुंबईतल्या इंग्रजी नावं असलेल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा मांडला होता. त्याच धर्तीवर एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं प्रभादेवी असं नामांतर  करण्यात आलं होतं.  याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार मुंबईच्या आणखी एका स्टेशनचं नामांतर करणार आहे. 

name of mumbai central terminus will be soon changed to nana shankarsheth terminus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com