Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

Palghar Ashram School Student Dies 19 Students Suffer Fever: मासवण आश्रमशाळेत सात वर्षीय श्रेयसचा संशयास्पद मृत्यू; १९ विद्यार्थ्यांना ताप, संभाव्य साथीच्या आजाराची भीती वाढली
Shocking Palghar Ashram School Incident 7 Year Old Student Dies 19 Students Report Fever After Nandurbar

Shocking Palghar Ashram School Incident 7 Year Old Student Dies 19 Students Report Fever After Nandurbar

esakal

Updated on

पालघर: गडचिराेलीच्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पालघरच्या मासवण आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मासवण आश्रमशाळेत शिकणाऱ्या अवघ्या सात वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक प्रकृती बिघडून रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. विशेष म्हणजे याच आश्रमशाळेतील १९ विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com