मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांचा सरकारवर हल्ला; नात्यातले दोन वकील नेमल्याचा आरोप

तुषार सोनवणे
Wednesday, 9 September 2020

मराठा आरक्षणाप्रकरण सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय खंडापीठाकडे पाठवले आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी यामुळे महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाप्रकरण सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय खंडापीठाकडे पाठवले आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी यामुळे महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश

राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, या खटल्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, सरकारने योग्य वकील नेमले नाहीत. आपल्याच नात्यागोत्यातील दोन साध्या वकीलांना यासंदर्भात काम दिले आहेत. याखटल्यात राज्याची बाजून मांडण्यात हे दोन्ही वकील आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीच नव्हतं. असा घणाघात राणे यांनी केला.

विधिमंडळ अधिवेशनात काय साध्य झाले. पहिल्या दिवशी अर्धाच दिवस कामगाज झाले. दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या आणि 12 विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सत्तारूढ पक्षाने फक्त विधिमंडळात हौदोस घातला.

'आज  मेरा घर तूटा है कल तेरा घमंड तूटेगा'; मुंबईत पोहचल्यानंतरही कंगनाचा घणाघात सुरूच

विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने कोरोनाकाळात लोकांचे होत असलेले हाल मांडले. शेतकरी, मजूर, बेकारी, उद्योजक, छोटे व्यवसाय करणारे अडचणीत आहेत. याबाबत कोणत्याच चर्चा अधिवेशनात करण्यात आलेल्या नाहीत. असेही राणे यांनी बोलताना म्हटले. 

दरम्यान आम्ही एखादी सूचना सरकारला केली तर त्यांना आरोप वाटते.  आम्ही तारीख जवळ येत होती तशी पाठपुराव्याला गती मिळण्यासाठी प्रयत्न करीत होतो परंतु तीन पक्षाचे सरकार असूनही कोणीही आरक्षण प्रश्नी जबाबदारी घेत नव्हतं असं मराठा आरक्षणातील याचिका विनोद पाटील यांनी म्हटले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane attacks government over Maratha reservation; Allegedly appointed two lawyers in the relationship