उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणतायत नारायण राणे ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्यानंतर पत्रकारांशी संवाद साधलाय. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याशी भेटून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतलाय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापण करण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितले. 

शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत कधीही जाऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपच सरकार स्थापन करणार आहे. सरकार स्थापनेसाठी जे जे आवश्‍यक आहे ते करू. विरोधी पक्षांचे आमदारही फोडू. मी आता भाजपमध्ये असल्याने पक्षासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत भाजपचेच सरकार स्थापन होणार. मी साम, दाम, दंड, भेद वापरून भाजपसाठी 145 चा आकडा गाठणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेसचे नेते उल्लू बनवत आहेत.

नारायण राणे यांच्या प्रेसवार्ता मधील महत्त्वाचे मुद्दे :  

  • मला आशा की भाजपची सत्ता येईल
  • सत्ता येण्यासाठी जे जे शक्य असेल ते मी करेन
  • सत्ता स्थापन करायला भाजपला मी मदत करीन
  • आजपर्यंत महाशिवआघाडीच्या अनेक  बैठका झाल्या, मात्र अद्याप काहीही हातात आलेलं नाही 
  • शिवसेना 'त्या' दोघांबरोबर जाऊ शकेल असे मला वाटत नाही
  • राष्ट्रपती राजवटीला जबाबदार शिवसेना आहे
  • निवडणुकी आधी युती झाली हे नैतिकतेला धरून नाही
  • मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी काम करेन
  • शिवसेनेला उल्लू बनवायचे काम दोन्ही पक्षांकडून केलं जातंय.
  • काँग्रेसचे नेते समोर काय बोलतात पाठिमागे काय बोलतात हे उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayn rane on uddhav thackeray