esakal | महाविकास आघाडीत बिघाडी? मंत्र्यांच्या विरोधात आमदाराची याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

महाविकास आघाडीत बिघाडी? मंत्र्यांच्या विरोधात आमदाराची याचिका

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : नाशिकचे (nashik) पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जिल्हा नियोजन विकास निधी विकल्याचा आरोप करणारी याचिका (petition) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (suhas kande) यांनी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील (mva Government) स्थानिक पातळीवरील राजकीय तंटा पुन्हा समोर आला आहे.

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांबाबत हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे

नाशिकमध्ये आलेल्या पुराचा फटका कांदे यांच्या नांदगाव या मतदारसंघाला बसला आहे. यामुळे त्यांनी व्यवस्थापन निधीतून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे केली होती. भुजबळ यांनी या विभागाचा पाहणी दौरा केला होता. मात्र तरीही त्यांनी निधी देण्यासाठी नकार दिला. नाशिक मधील एका जाहीर सभेत त्यांच्यात शाब्दिक आरोपही झाले होते.

याचिकेत नाशिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी केले आहे. भुजबळ यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कांदे यांनी निवडणुकीत भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे.

loading image
go to top