सरकारने व्हॅट घटवल्याने नैसर्गिक वायूचे दर घटले; गृहिणींना सुखद धक्का

VAT-Taxes
VAT-TaxesSakal media

मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) नैसर्गिक वायूवरील व्हॅटचे दर (vat rate) घटवल्याने महानगर गॅसने (Mahanagar Gas) सीएनजीचे दर किलोमागे सहा रुपये तर पीएनजीचे दर घनमीटरमागे साडेतीन रुपयांनी घटवले आहेत. बऱ्याच काळानंतर नैसर्गिक वायूचे दर घटल्यामुळे मुंबईकर गृहिणींना (Housewife) तसेच वाहनचालकांना हा सुखद धक्का मिळाला आहे. राज्य सरकारने नुकताच नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कर (व्हीएटी) साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत आणला आहे.

VAT-Taxes
रायगड : कुणबी समाज शिवसेनेपासून दुरावणार?समाजाची नाळ तुटण्याची शक्यता

सरकारची ही घट एक एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे दर कमी होण्याचा सारा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय महानगर गॅस ने घेतला आहे. त्यानुसार आता गुरुवारच्या (ता.३१) मध्यरात्रीपासून म्हणजेच एक एप्रिलच्या पहाटेपासून महामुंबई परिसरातील नैसर्गिक वायूचे दर कमी होतील. आता सीएनजी चा दर प्रति किलोमागे (सर्व करांसह) साठ रुपये एवढा असेल. तर स्वयंपाकाच्या घरगुती पीएनजी चा दर प्रति घनमीटरमागे ३६ रुपये एवढा राहील.

आता वाहनांसाठी पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत नव्या दरानुसार सीएनजी अनुक्रमे ६५ टक्के व ४१ टक्के एवढा स्वस्त पडेल. तर स्वयंपाकाच्या घरगुती सिलेंडरच्या तुलनेत नव्या दरानुसार महानगर गॅसचा पीएनजी पाईप गॅस हा ३२ टक्के स्वस्त राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com