
Mumbai News: तुर्भे एमआयडीसीहून बोनकोडे येथे जाणाऱ्या तरुणींच्या स्कुटरला भरधाव कारने कोपरा गावाजवळ धडक दिल्याने या तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १२) सकाळी घडली. या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.