नवी मुंबई ठरलं राज्यातील पहिलं शहर; दोन्ही डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण

corona vaccination
corona vaccinationsakal media

वाशी : नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai municipal corporation) ६ जानेवारी २०२१ मध्ये आरोग्यकर्मींपासून कोविड लसीकरण (corona vaccination) सुरू केले. नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या योग्‍य नियोजनामुळे १८ वर्षांवरील नागरिकांचे लशीचे दोन्ही डोस १०० टक्के पूर्ण करणारे (hundred percent vaccination) नवी मुंबई हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस घेणे सोपे जावे, याकरिता महापालिकेने १११ पर्यंत लसीकरण केंद्रे (vaccination center) सुरू केली. पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका होती. तोच वेग कायम राखत पालिकेने दुसऱ्या डोसचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष दिले.

corona vaccination
भाजपच्या राज्यात पवित्र सोमरस पण महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार असं का ?

त्या अनुषंगाने १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे ११,०७,००० इतके उद्दिष्ट नवी मुंबई महापालिकेने पार केले असून आजतागायत ११,०७,४५४ नागरिकांना कोविड लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासही ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात झाली असून त्यांच्या पहिल्या डोसचेही १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे व दुसऱ्या डोसचेही लसीकरण गतिमानतेने पूर्ण करून घेण्यात येत आहे. याशिवाय १० जानेवारीपासून तिसऱ्या अर्थात प्रिकॉशन डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

त्यामध्येही ७,१३९ आरोग्यकर्मी, ७,२४१ पहिल्या फळीतील कोरोनायोध्दे तसेच २१,४२० इतके ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ३५ हजार ८०० नागरिकांनी दुसऱ्या डोसनंतर ९० दिवसांनी अथवा ३६ आठवड्यांनी देण्यात येणाऱ्या प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे.

लसीच्या उपलब्धतेनुसार योग्‍य नियोजन आणि आरोग्याविषयी जागरूक नवी मुंबईकरांनी महापालिकेच्या आवाहनाला दिलेल्‍या प्रतिसादामुळे शंभर टक्‍के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. कोविडचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, याची जाणीव ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी न चुकता विहित वेळेत तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस घ्यावा.
- अभिजित बांगर, आयुक्‍त नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com