देवेंद्र फडणवीस पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले चॅलेंज 

टीम ई-सकाळ
Sunday, 16 February 2020

हिंमत असेल तर, सरकार पाडून दाखवा, असं चॅलेंज मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

नवी मुंबई : राज्यात पूर्ण ताकदीनं पुन्हा मैदानात उतरायला हवं, असं आवाहन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना करताना आज, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकार जोरदार टीका केली. येत्या महापालिका निवडणुकीत नवी मुंबईत भाजचीच सत्ता येईल तर, औरंगाबादच्या महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना औरंगाबादमध्ये कोणतं तोंड घेऊन मतं मागायला जाते, हे पहायचच आहे, असा  टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. नवी मुंबईत भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रत जनादेशाचा अपमान झाला, असे सांगताना देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुक्ताईनगरमधील वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. हिंमत असेल तर, सरकार पाडून दाखवा, असं चॅलेंज मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'तुम्ही सरकार पाडण्याचं आव्हान देता आम्ही सरकार पाडणारे नाही. पाडणारही नाही. पण, हिंमत असेल तर, जनतेच्या कोर्टात पुन्हा जाऊ, जनतेला विचारू तुमच्या मनातलं हे सरकार आहे? आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे का?' भाजपमध्ये पद म्हणजे एक जबाबदारी आहे, असंही फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना स्पष्ट केलं. 

आणखी वाचा - ठाकरे सरकारचा सिद्धेश्वर कारखान्याला दिलासा 

आणखी वाचा - इंदुरीकर महाराजांवरील टीकेवरून तृप्ती देसाईला इशारा

फडणवीस म्हणाले

  • काँग्रेस रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते 
  • उद्धव ठाकरे हिंमत असेल तर,स काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदी टाकून दाखवा 
  • छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागतात, हा छत्रपती घराण्याचा अपमान 
  • जनतेच्या हितासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरणार 
  • प्रकल्पांची नावं बदला पण, कामं थांबवू नका 
  • एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai bjp meeting devendra fadnavis challenge cm uddhav thackeray