सिडकोकडून बाजारात १४ भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

cidco
cidcosakal media

नवी मुंबई : महिला वसतिगृह, संयुक्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता सिडको महामंडळाकडून (CIDCO) ४ स्वतंत्र योजनांतर्गत विक्री करीता भूखंड (land selling) उपलब्ध करण्यात आले आहे. यात अर्थार्जन करणाऱ्या महिलांकरिता वसतिगृहे, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) अशा विविध सामाजिक उपक्रमांकरिता, नवी मुंबईच्या (navi mumbai) विविध नोडमध्ये एकूण १४ भूखंड विक्रीकरिता उपलब्ध केले आहेत.

cidco
वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

एकूण १४ भूखंडांपैकी महिला वसतिगृहाकरिता ४, संयुक्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकरिता एका योजने अंतर्गत ३ व दुसऱ्या योजनेंतर्गत ५ आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) उपक्रमाकरिता २ भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिडको महामंडळाकडून, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने विकास प्रकल्पांबरोबरच सामाजिक उद्देशांकरिताही भूखंड भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात येतात. या वेळेस ४ स्वतंत्र योजनांतर्गत अर्थार्जन करणाऱ्या महिलांकरिता वसतिगृहे, संयुक्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) या सामाजिक उपक्रमांकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अर्थार्जन करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहाकरिता घणसोली, कोपरखैरणे, उलवे व खारघर येथील प्रत्येकी १ याप्रमाणे ४ भूखंड उपलब्ध आहेत. संयुक्त शाळा आणि महाविद्यालयाकरिता एका योजने अंतर्गत सर्वसाधारण संस्थांसाठी सानपाडा येथे १ व द्रोणागिरी येथे ४ असे ५ तर दुसऱ्या योजने अंतर्गत नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांसाठी वाशी, द्रोणागिरी व उलवे येथील प्रत्येकी १ भूखंड याप्रमाणे ३ भूखंड उपलब्ध आहेत. उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) उपक्रमाकरिता खारघर व घणसोली येथील प्रत्येकी १ याप्रमाणे २ भूखंड उपलब्ध आहेत. सदर १४ भूखंड हे ८५८.३० चौ.मी. ते १२,१९६.४० चौ.मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे आहेत.

"नवी मुंबईच्या भौतिक विकासबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासही सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. चार स्वतंत्र योजनांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्थार्जन करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह यांसारख्या उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणासही हातभार लागणार आहे."
- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com