नव्या वर्षात नवी मुंबई शहर होणार पूर्ण लसवंत

दोन्ही डोस शंभर टक्के पूर्ण करण्यास जानेवारी महिना उजाडणार
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

नवी मुंबई : कोविड लसीकरणातील (corona vaccination) पहिला डोस (first dose) शंभर टक्के नागरिकांना (All people) देण्यात यश मिळवल्यानंतर नवी मुंबई महापालिका (navi mumbai municipal) नव्या वर्षात दोन्ही डोस (two dose) शंभर टक्के नागरिकांना देण्याचा नवा विक्रम (new record) करण्याची शक्यता आहे. पात्र लोकांपैकी तब्बल ११ लाख ७ हजार २३३ लोकांना पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी शिल्लक ५ लाख २२ हजार लोकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस (covisheild dose) टोचण्यासाठी ८४ दिवसांच्या अंतराने १५ जानेवारी २०२२ पर्यंत वेळ जाणार आहे.

Corona Vaccination
मुंबई : आरपीएफ महिला जवानाने वाचवले प्रवासी महिलेचे प्राण

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी लसीकरणाचा ध्यास घेतला आहे. तिसरी लाट येण्याआधीच शहरातील जास्तीत जास्त नागरीक लसीकरणाने सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार रोजच्या रोज लसीकरणाचा आढावा घेत समाजातील वेगवेगळ्या घटकांना लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून शहरात १०१ लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त लसीकरण केंद्रांपर्यंत न पोचता आलेल्या नागरिकांसाठी थेट मोबाईल व्हॅनद्वारे ‘लस आपल्या दारी‘ हा उपक्रमही आरोग्य विभागातर्फे राबवण्यात आला. काही लसीकरण केंद्रांच्या संध्याकाळची ६ वाजताची वेळ वाढवून ९ वाजेपर्यंत करण्यात आली. जेणेकरून रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नागरीकांना लस घेता यावी.

महापालिकेने केलेल्या या विविध उपाययोजनांचे फलित म्हणूनच पालिकेला सर्वात कमी वेळेत ११ लाख ७ हजार २३३ लोकांना कोविड लसीचा पहिला डोस शंभर टक्के देता आला. त्यापैकी ५ लाख ७६ हजार ५६७ लोकांना पालिकेने दुसरा डोस टोचून ५२ टक्क्यांपर्यंत दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. उर्वरित लोकांना दुसरा डोस देण्यासाठी पालिकेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

८४ दिवसांचा अवधी


सरकारतर्फे सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा पुरवठा महापालिकांना करण्यात येत आहे. त्यानुसार कोविशिल्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांचे अंतर ठेवावे लागते. तर कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस २२ दिवसांच्या फरकाने घ्यावा लागतो. परंतु दोन्ही लशींच्या तुलनेत कोविशिल्ड अधिक लोकांना दिल्‍याने पालिकेला पूर्णपणे लसवंत होण्यास ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

Corona Vaccination
रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार का? हायकोर्टाचा सवाल

दुसऱ्या डोसची आकडेवारी
लसीकरण लाभार्थी
डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी (HCW)
दुसरा डोस - २२९७०
पोलिस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW)
दुसरा डोस - २१९४७

६० वर्षांवरील नागरिक (६०+)
दुसरा डोस - ८१६८०

४५ ते ६० वयोगटातील नागरिक
दुसरा डोस - १६५४५४

१८ ते ४५ वयोगटातील नागरिक
दुसरा डोस - २८४५१६

एकूण
दुसरा डोस - ५,७६,५६७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com