esakal | नवी मुंबई: कोविड योद्ध्यांच्या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ | Corona Warriors
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Warriors

नवी मुंबई: कोविड योद्ध्यांच्या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या (CIDCO) कोविड योद्धे (corona warriors) आणि गणवेषधारी कर्मचारी गृहनिर्माण योजनेकरिता अर्जदारांना कर्जाची प्रक्रिया (loan procedure) पूर्ण करण्यास पुरेसा अवधी मिळावा, याकरिता सदर योजनेस मुदतवाढ (extension) देण्यात आली आहे. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जदारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे (Applicants documents) गोळा करण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

या योजनेला २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करणे सुलभ व्हावे याकरिता सिडकोने आपल्या एम्पॅनल्ड बॅंकांमार्फत कर्जाची सुविध उपलब्ध करून दिली आहे. अधिवास प्रमाणपत्र, कोविड योद्धा प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे गोळा करण्यास जाणारा वेळ विचारात घेऊन मुदतवाढ देण्यात आल्याने कोविड योद्ध्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे.

सिडकोकडून १५ ऑगस्ट २०२१ ला कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये एकूण ४,४८८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण ४,४८८ घरांपैकी १०८८ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३४०० घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता २ लाख आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता २ लाख ५० हजार अनामत रक्कम लागू आहे. यापूर्वी, सदर योजनेकरिता ०९ सप्टेंबर २०२१ ही अंतिम मुदत होती. परंतु, अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरून योजनेस ०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अनेक अर्जदारांनी कोविड-१९ महासाथ व टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, अनामत रक्कम भरण्याकरिता काहीतरी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती सिडकोला केली होती. या विनंतीनुसार सिडकोने आपल्या एम्पॅनल्ड बॅंकांशी संपर्क साधून अर्जदारांना अनामत रक्कम भरण्याकरिता कर्ज पुरवठा करण्याबाबत सुचवले.

loading image
go to top