नवी मुंबई : नवजात मुलाला रुग्णालयात सोडून मातेचे पलायन; गुन्हा दाखल | Navi mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mother leaves her baby

नवी मुंबई : नवजात मुलाला रुग्णालयात सोडून मातेचे पलायन; गुन्हा दाखल

नवी मुंबई : वाशी येथील महापालिकेच्या (Vashi municipal) रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी (women delivery case) दाखल झाली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर नवजात मुलाला रुग्णालयात सोडून (women leaves child) तिने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मनिमेघला विनोद जाधव (२८) (Manimeghala jadhav) असे तिचे नाव असून वाशी पोलिसांनी (vashi police) तिच्याविरोधात गुन्हा दाखल (police FIR) केला आहे.

हेही वाचा: ठाणे : तीन वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, नराधमास फाशीची शिक्षा

तर नवजात बाळाला नेरूळ येथील बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनिमेघला विनोद जाधव ३ सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात दाखल होताना, मानखुर्दमधील साठेनगर लल्लुभाई कंपाऊंड असा पत्ता दिला होता. हिने मुलाला जन्म दिल्यानंतर नवजात मुलावर महापालिकेच्या एनआयसीयू वार्डमध्ये उपचार सुरू होते. ६ सप्टेंबर रोजी मनिमेघला हिची सोनोग्राफी करायची असल्याने रुग्णालयातील महिला कर्मचारीने तिला वार्ड २८ मध्ये नेले होते. यावेळी महिला कर्मचारी तिला वार्डबाहेर बसवून डॉक्‍टरांकडे कागदपत्रांची फाईल दाखवण्यासाठी गेली होती.

याचवेळी मनिमेघलाने संधी साधत रिक्षामधून पलायन केले. काही वेळानंतर महिला कर्मचारी बाहेर आल्यानंतर तिला मनिमेघला निदर्शनास न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. दिलेल्‍या पत्त्‍यावरही ती न सापडल्‍याने आणि बाळाला घेण्यासाठीही रुग्‍णालयात न आल्‍याने अखेर रुग्णालयाच्या वतीने सोमवारी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

loading image
go to top