Navi Mumbai Crime: किरकोळ कारणावरुन दोघांवर चाकुने प्राणघातक हल्ला

When Alok went to rescue them, Ajay stabbed him. Alok is undergoing treatment in intensive care unit and Ajay Sharma is absconding.
Crime
Crimesakal

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे, सेक्टर १९ भागात राहणाऱ्या अजय शर्मा नामक तरुणाने किरकोळ कारणावरून आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणावर व त्याच्या चुलत भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री कोपरखैरणेत घडली.

या हल्ल्यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी अजय शर्मा याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Crime
Navi Mumbai Crime: चोरांच्या दहशतीने रात्री तरुणांकडून जागता पहारा; उरण परिसरात गावांची सुरक्षा धोक्यात

आरोपी अजय शर्मा हा कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये राहण्यास असून बुधवारी रात्री त्याचे त्याच्या आईसोबत जोरदार वादावादी सुरू होती. त्यामुळे शेजारी राहणारे दिनेश सिंग हे त्यांना समजावण्यासाठी गेले होते.

मात्र अजय शर्मा याने उलट त्यांना शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी दिनेश सिंग यांची मुलगी चांदणी ही त्यांना सोडवण्यासाठी गेली असताना आरोपीने चांदणीला बेदम मारहाण केली.

Crime
Navi Mumbai Crime: पनवेलमध्ये व्यावसायिकाला ४४ लाखांचा गंडा

त्यामुळे दिनेश सिंग यांचा पुतण्या अनुज सिंग याने अजय शर्मा याला धक्का देऊन बाजूला केल्याने अजय शर्मा याला त्याचा राग आला. त्याने अनुज शर्मा याच्या डोक्यात हातातील स्टीलच्या कडीने मारून त्याला गंभीर जखमी केले.

त्याला रुग्णालयात दाखल केले. अनुजचा चुलत भाऊ अलोक याला याबाबत माहिती मिळताच अलोक व दिनेश हे दोघे रात्री अजय शर्मा याला जाब विचारण्यासाठी गेले होते. तेव्‍हा अजय याने दिनेश यांना मारहाण केली. अलोक हा त्यांना सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर अजय याने चाकूने केला. अलोक याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून अजय शर्मा फरार झाला आहे.

Crime
Navi Mumbai Crime: स्‍वस्त‍ात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक; गुन्हा दाखल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com