Navi Mumbai Crime: खांदेश्वर, पनवेल व परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड

Koyta Attack in Pune
Koyta Attack in PuneEsakal

Navi Mumbai Crime: नवीन पनवेल, कामोठे परिसरातून मोटारसायकल चोरून त्यांची परराज्यांत विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना खांदेश्‍वर पोलिसांनी अटक केली.(New Panvel, Kamothe)

जगदीश चुन्नीलाल माळी (वय २४), प्रवीण रामलाल सिरवी (२५) व अरविंदकुमार भंवरलाल हिरागर (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीच्या पाच बुलेट व इतर सहा मोटारसायकल हस्तगत करून दुचाकी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या टोळीतील इतर दोन फरारी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.(Jagdish Chunnilal Mali, Praveen Ramlal Sirvi and Arvind Kumar Bhanwarlal Hiragar)

काही दिवसांपासून बुलेट मोटारसायकल गाड्यांसह इतर मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. याबाबत परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. एक दुचाकी चोरताना हे चोरटे सीसी टीव्हीत कैद झाले होते.

पोलिसांनी तीन दिवस सीसी टीव्ही फुटेजमधील संशयितांच्या लोकेशनचा मागोवा घेतला असता संशयित चोरटा हा त्याच्या दोन साथीदारांसह नवीन पनवेलमधील शिवा कॉम्प्लेक्स परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पहाटे सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गाड्यांचे नंबर बदलून राजस्थानमधील पाली येथे पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

दिवसा दुकानात काम; रात्री दुचाकी चोरी

तिन्ही आरोपी राजस्थानमधील मारवाड येथील पाली गावातील आहेत. तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांत काम करत होते. रात्री ते बुलेट आणि इतर मोटारसायकली चोरत होते. त्यानंतर चोरीच्या दुचाकी ते राजस्थान व इतर भागांत विक्रीसाठी पाठवून देत होते.

काही मिनिटांत बुलेटची चोरी

परिसरातील रात्री उभ्या असलेल्या बुलेटचा शोध घेत असत. बुलेट सापडल्यानंतर तिच्या चावीचे स्विच काढून त्यातील दोन वायरी जोडून काही मिनिटांत सुरू करत होते. पनवेल शहर, कामोठे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक, खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन बुलेटची चोरी केली होती. त्याचप्रमाणे इतर मोटारसायकलही त्यांनी चोरल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com