नवी मुंबई : क्रेडीट कार्डमधून परस्पर ६५ हजाराची खरेदी; गुन्हा दाखल | Navi Mumbai crime Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

नवी मुंबई : क्रेडीट कार्डमधून परस्पर ६५ हजाराची खरेदी; गुन्हा दाखल

नवी मुंबई : कोपरखैरणेतील (koparkhairne) एका व्यावसायिकाच्या (Businessman) क्रेडीट कार्डमधून (credit card) परस्‍पर ६५ हजारांची खरेदी करून फसवणूक (money fraud) केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल (Police FIR) केला आहे.

हेही वाचा: 'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नाही,संप मागे घ्या' - परब

कांदिवली राहणारा महम्मद नसीम महम्मद अमीन चौधरी (२४) याचे कोपरखैरणे सेक्टर-२० मध्ये चौधरी इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. ३ ऑक्टोबर रोजी चौधरी रात्री १२ च्या सुमारास घरी निघाले असता, त्‍यांच्या मोबाईलवर एचडीएफसी बँक खात्यातून ६४,९९९ रुपये कट झाल्याचे व त्याची खरेदी अमेझॉन ॲपवरून झाल्याचा मेसेज आला. चौधरी याने तत्काळ कस्टमर केअरला फोन करून क्रेडीट कार्ड ब्लॉक केले. मात्र तोपर्यंत त्‍यांच्या क्रेडिट कार्डवरून ६४,९९९ रुपयांची खरेदी करण्यात आली होती. त्‍यांनी याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

loading image
go to top