police fir
police firsakal media

नवी मुंबई : फेरफटका मारणाऱ्या तरुणाला मारहाण करुन लूट

लुटमारहाण करून तरुणाला लुबाडले
Published on

नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्‍थानकाच्या (Jui nagar railway station) पश्चिम भागात रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोघांनी जबर मारहाण (beating case) केली. आणि त्याच्याजवळ असलेला मोबाईल, अंगठी व सोनसाखळी असा सुमारे लाखभर रुपये किमतीचा ऐवज लुटून (Gold robbery) पलायन केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. सानपाडा पोलिसांनी (sanpada police) या घटनेतील दोघांविरोधात गुन्हा दाखल (police FIR) केला आहे.

police fir
पुन्हा निर्बंधांची धास्ती; नव्या व्हेरिएंटमुळे नियम आणखी कठोर

वाशी सेक्टर-९ भागात मध्ये राहणारा विशाल कश्यप (२८) एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कामाला आहे. २५ नोव्हेंबर रोजी जेवण केल्यानंतर तो रात्री १० वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला होता. यावेळी तो लोकलने जुईनगर रेल्वे स्टेशनवर उतरला. स्थानकाच्या पश्चिमेकडे सेक्टर-११ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चालत जात होता.

या वेळी अंधारात फायदा घेत दोघांनी त्‍याला मारहाण केली. तसेच धमकावून त्याच्याजवळ असलेला ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल, सोन्याची अंगठी व सोनसाखळी असा सुमारे एक लाखभर रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. त्यानंतर विशालने दुसऱ्या दिवशी सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com