सीवूड्समध्ये मोबाईल दुकानावर डल्ला; तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल | Navi Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

सीवूड्समध्ये मोबाईल दुकानावर डल्ला; तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी सीवूड्स (Sea woods) सेक्टर ४६-ए मधील जिओ स्टोर (Jio Store robbery) फोडून मोबाईल व अन्य वस्तू असा १२ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्याचे उघडकीस आले. एनआरआय पोलिसांनी (NRI Police) या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल (Police Fir) केला असून शोध सुरू केला आहे.

हेही वाचा: मुंबई : पालिका रुग्णालयात अॅलर्जीच्या रूग्णांमध्ये 50 टक्के वाढ

सीवूड्स सेक्टर ४६-ए मधील श्रीजी हाईट्स या इमारतीतील जिओ कंपनीच्या दुकानाचे शटर उचकटून सोमवारी पहाटे तिघा चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी महागडे मोबाईल, एक्सेसरीज, स्मार्ट वॉच व इतर वस्तू घेऊन पळ काढला. या दुकानातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीकडून दुकानातील कर्मचाऱ्यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सकाळी दुकानात धाव घेतली.

यामुळे दुकानदारांना चोरट्यांनी दुकान साफ केल्याचे निर्दशनास आले. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसी टीव्ही चित्रण तपासले. पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

loading image
go to top