नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

कोरोनामुळे गेले महिनाभर बंद असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. नवी मुंबई पोलिसांची बांधकाम, भराव, वाहतूक करणे आदी कामाला परवानगी मिळाल्यानंतर सिडकोने प्रत्यक्ष विकासपूर्व कामाला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई, ता. 25 : कोरोनामुळे गेले महिनाभर बंद असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. नवी मुंबई पोलिसांची बांधकाम, भराव, वाहतूक करणे आदी कामाला परवानगी मिळाल्यानंतर सिडकोने प्रत्यक्ष विकासपूर्व कामाला सुरुवात केली आहे.

पनवेल गाढी नदीच्या शेजारी आणि उलवे टेकडीजवळच्या ११०० हेक्टरवर सिडकोतर्फे जमीन भराव टाकणे, टेकडी फोडून सपाटीकरण करणे आदी महत्त्वाची कामे सुरू होती. त्याचबरोबर भरावाची कामे पूर्णत्वास येऊन धावपट्टीच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली जाणार होती. मात्र, त्याआधीच कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने सर्व विकासकामे बंद केली. याचा सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना फटका बसला आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईत उभारण्यात येत असलेला विमानतळाचा प्रकल्पही यामुळे थांबला गेला. मात्र, पोलिस परवानगी, कामगारांची जमवाजमव आदी बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल

या आधीच सिडकोने ९७ टक्के विकासपूर्व कामे पूर्ण केली आहेत. आता या कामांना अंतिम रूप देण्यात येणार आहे. विमानतळाच्या प्रकल्पाव्यतिरिक्त ज्या ठिकाणी उड्डाण केले जाणार नाही, अशा भागातील कामांनाही गती मिळणार आहे. विमानतळ प्रकल्पात कोव्हिड-१९ बाबत सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच काम केले जाणार असल्याची माहिती सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली.

navi mumbai international airport work resumed after one month


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai international airport work resumed after one month