नवी मुंबई : ऐन होळी उत्सवात खारघर, तळोजामध्ये पाणी टंचाई

water scarcity
water scarcitysakal media

खारघर : खारघर आणि तळोजा परिसरात (Kharghar And Taloja) काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना ऐन होळी उत्सवात पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून तळोजा सेक्टर २६ आणि इतर भागांतील नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. ज्या भागात पाणीपुरवठा (water supply issue) होतो, तो सुद्धा कमी दाबाने होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

water scarcity
रायगड : पोषण आहाराची चोरी; सहा जणांना ठोकल्या बेड्या

तळोजा वसाहतीतमधील फेज एक आणि परिसरात काही ठिकाणी पाणी नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. पिण्यासाठी, अंघोळ आणि इतर वापरासाठी पाणीच नसल्याने करायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही सेक्टरमध्ये ३० ते ४० मिनिटे पाणीपुरवठा होतो, तेही कमी दाबाने होत असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खारघर सेक्टर ३, ११, १२, १३, १९, २० आणि सेक्टर ३० ते ३५ आदी भागांत काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, शटडाऊनमुळे समस्या निर्माण झाली होती.

लवकरच ही समस्या दूर होईल, असे आश्वासन दिले जाते. दरम्यान शुक्रवार, शनिवार होळी सण आहे. पाण्याची नासाडी करू नये, असे कितीही बजावून मुलांना सांगितले तरी ते होळी खेळतात. त्यामुळे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने होळी सणाचा विचार करून पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खारघर, तळोज्यातील नागरिकांनी केली आहे.

water scarcity
नवी मुंबई मेट्रो मार्च मध्ये धावणार ? नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

तळोजा फेज दोनमध्ये काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक सोसायटीत केवळ १० ते १५ मिनिटे पाणी येते. ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करावे लागेल.
- प्रवीण दळवी, रहिवासी तथा मनसे पदाधिकारी, तळोजा पनवेल तालुका

खारघर सेक्टर ११ मध्ये १५ ते २० मिनिटे पाणी येते. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अडचणी येत आहे. सिडकोने पाणी समस्या कायमची सोडवावी.
- सदानंद सिरस्कर, सेक्टर ११, खारघर रहिवासी

तळोजा वसाहतीत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. पाणी जास्त मिळावे, यासाठी अधिकाऱ्यांसोबत बोलणी सुरू आहे. शटडाउन घेतल्यामुळे काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला होता. ही समस्या लवकरच दूर केली जाईल.
- नानिक चोइथानी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com