गणेश नाईक यांच्या मागणीला सिडकोकडून सकारात्मक प्रतिसाद

प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबवा
Ganesh Naik
Ganesh Naiksakal media

वाशी : नवी मुंबईसाठी (Navi mumbai) येथील स्थानिकांनी आपल्या जमिनी (land for cidco) सिडकोला कवडीमोल भावाने दिल्या. सिडकोने मात्र या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन (Project victim resettlement) पूर्ण केले नाही. काळाच्या ओघात स्थानिकांची कुटुंबे वाढली. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग लक्षात घेता त्यांच्यासाठी सिडकोने स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प (house project) राबवावा, अशी मागणी ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी (sanjay Mukharjee) यांच्याकडे केली. या मागणीला मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Ganesh Naik
१०० टक्के नवी मुंबईकरांना लशीचा पहिला डोस; MMR क्षेत्रातील पहिली पालिका

सिडकोसंबंधित विविध प्रलंबित विषयांवर ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत सोमवारी (ता. १८) बैठक झाली. सिडको मुख्यालयात झालेल्या बैठकीत नागरी सुविधांच्या वापरासाठी भूखंडांचे हस्तांतरण आणि प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्पाच्या मागणीवर मुखर्जी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कोरोनाकाळात सिडकोने अन्य महापालिकांसाठी स्वखर्चाने रुग्णालय बांधले. त्याच धर्तीवर ज्या ठिकाणी सिडको मोठी झाली त्या नवी मुंबईसाठीही स्वत:च्या भूखंडावर किमान एक हजार खाटांचे ऐरोली विभागात सुसज्ज रुग्णालय बांधून ते महापालिकेकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी नाईक यांनी केली. त्यावर मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह अन्य माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

निधीअभावी काम थांबू नका

सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घणसोली-ऐरोली-पाम बीच रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर सिडको त्यासाठी ५० टक्के रक्कम महापालिकेला देणार आहे. सिडको या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. निधीअभावी या रस्त्याचे काम थांबू नये, यासाठी सिडकोने टप्प्याटप्प्याने पालिकेकडे निधी वर्ग करावा, अशी मागणी आमदार नाईक केली.

Ganesh Naik
विष्णूदास भावे नाट्यगृहात तिसरी घंटा वाजणार; २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

नागरी सुविधांसाठी भूखंड

ऐरोली सेक्टर १० ए आणि दिघा येथील ईश्वरनगर व बाली नगर येथे सिडकोचे मोकळे भूखंड आहेत. समाज मंदिर, व्यायामशाळा, महिला सक्षमीकरण केंद्र, उद्यान आदी सार्वजनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणचे भूखंड पालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करावेत, अशी मागणी नाईक यांनी बैठकीत केली.

जुईनगर येथे पादचारी पूल उभारावा

जुईनगर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी जुईनगर येथे रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारावा. त्याकरता १६२० स्क्वेअर मीटर जागेची आवश्यकता आहे. ही जागा सिडकोने महापालिकेला देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही आमदार गणेश नाईक यांनी सूचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com