गद्दारी कशी खुंपते हे नविन गवतेंनी दाखवून दिले; जितेंद्र आव्हाड यांची गणेश नाईकांवर टीका

गद्दारी कशी खुंपते हे नविन गवतेंनी दाखवून दिले; जितेंद्र आव्हाड यांची गणेश नाईकांवर टीका

वाशी - ठाणे जिल्हाचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच नाईकांचे कट्टर समर्थक असणारे माजी नगरसेवक नविन गवते यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडवर नाईकांची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडचणीच्या काळात असताना गणेश नाईक यांनी साथ सोडली होती, तसेच आता नाईक अडचणीत असताना नवीन गवते यांनी त्यांची साथ सोडली आहे. गवते यांनी गणेश नाईक यांना गद्दारी कशी खुंपते हे दाखवून दिले असल्याची टीका महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

दिघा येथील हिंदमाता विद्यालयाच्या प्रागंणात राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामंगार संघटनाचे अध्यक्ष किशोर आंग्रे व दिघा तालुका महिला अध्यक्ष गौरी आंग्रे यांनी हळदीकुंकू व अन्य एका समारंभात आव्हाड बोलत होते. या वेळी समाजसेविका रुतू आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष अशोक गावडे आदी उपस्थित होते. 
दिघा येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली तेव्हा नवीन गवते व संदीप नाईक यांनी रहिवाशांकडे पाठ फिरवली होती. तर आमदार विद्या चव्हाण व रुतू आव्हाड या दिघ्यातील रहिवाशांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. अनधिकृत इमारतीमध्ये नविन गवते यांच्या नावावरच चाळीस इमारती असून त्यामधून त्यांनी पैसे कमावले, पण येथील रहिवाशांना बेघर केले, असा आरोप आव्हाड केला आहे. 

नवीन गवते हा माझा कार्यकर्ता असून त्याला राजकारणातील बाळकडू मी दिले आहे. दिघातील इमारती वाचवण्यासाठी माझ्याकडे आला होता. पण वेळप्रसंगी त्याने सेनेत प्रवेश केला. माझ्यातला प्रमाणिकपणा घेऊ शकला नाही, अशी खंत यावेळी आव्हाड यांनी व्यक्‍त केली. 

गावठाणाची मर्यादा वाढवणार 
गावगावठाणामध्ये गरजेनुसार ज्यांनी घरी वाढवली, त्या घरांसाठी गावठाणांची मर्यादा दोन किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून हा निर्णय अमलात येईल, अशा विश्‍वास गृहनिर्माणमंत्री डॉ जितेंद्र आव्हाड व्यक्‍त केला.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

navi mumbai latest politics marathi jitendra awhad again criticism on ganesh naik navin gavate issue political update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com