esakal | कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; NMMT कडून कामगारांची वेतनवाढ तुंबली | Workers Strike
sakal

बोलून बातमी शोधा

Strike

कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; NMMT कडून कामगारांची वेतनवाढ तुंबली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी : नवी मुंबई महापालिकेच्या (navi mumbai municipal) परिवहन उपक्रमात कार्यरत असणाऱ्या कामगारांचे तब्बल ३३ महिन्यांची वेतनवाढ (workers salary issue) रखडली आहे. सरकारने (mva Government) आदेश दिल्यानंतरही २०१५ पासून वाढलेल्या वेतनातील फरकाची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही. याप्रकरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत (workers problem) इंटकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत (Ravindra sawant) यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांची भेट घेत आंदोलनाचा (Strike) इशारा दिला.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

२०१५ पासूनची ३३ महिन्यांची थकबाकी देण्यात यावी. प्रशासनातील अन्य कामगारांना ही थकबाकी मिळालेली आहे. तथापि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना यापासून का वंचित ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. कामगारांना जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. २०२१पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्यात ४५५ रुपये वाढ झाली आहे, ती देण्यात यावी.

परिवहन विभागातील सफाई कामगारांना कोविड भत्ता देण्यात यावा. कोरोनाकाळात त्यांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या जीविताची पर्वा न करता इमानेइतबारे काम केलेले आहे. एनएमएमटीच्या बसचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर केल्यानंतर त्यांनी रोज त्या बसची स्वच्छता व सफाई कोरोनाकाळात कोणतीही तक्रार न करता केली आहेत. सिडको व म्हाडाकडून देण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी आवश्यक असणारे कोरोनायोद्धा प्रमाणपत्र या कामगारांना देण्यात यावे. गणवेश शिलाईचे पैसे प्रशासनाने येत्या पगारात द्यावेत. तसेच, यापुढे गणवेशचा कापड आणि शिलाईचे पैसे परिवहनकडूनच देण्यात यावे. १ सप्टेंबर २०२० ते ३१ ऑगस्टपर्यंतचा दिवाळी बोनस आणि पगार दिवाळीआधी कामगारांना देण्यात यावा, अशा मागण्या सावंत यांनी कडूस्कर यांच्याकडे केल्या आहेत.

कामगार संघटनांचा संताप

परिवहन विभागातील कामगारांच्या समस्या २०१५ पासून प्रलंबित आहेत. आपल्याच सुविधांसाठी त्यांना गेली ७ वर्षे संघर्ष व पाठपुरावा करावा लागणे हे परिवहन विभागाचे अपयश आहे. श्रीमंत आणि स्वमालकीचे धरण असणारी महापालिका, अडीच हजार कोटींच्या ठेवी, केंद्र व राज्य पातळीवर पुरस्कार मिळवणारी असा नावलौकीक असणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागाकडून कामगारांचे शोषण व्हावे, ही लाजिरवाणी बाब आहे, असे सांगत इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी संताप व्यक्त केला.

loading image
go to top