नवी मुंबईत लवकरच इलेक्‍ट्रिक चार्जिंग स्टेशन्स स्थापन होणार; माजी खासदारांनी दिली महत्वपूर्ण माहिती

सुजित गायकवाड
Sunday, 24 January 2021

केंद्र सरकारच्या योजनेतून नवी मुंबईमध्ये नव्या वर्षात इलेक्‍ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई  : केंद्र सरकारच्या योजनेतून नवी मुंबईमध्ये नव्या वर्षात इलेक्‍ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यात येणार आहेत. पर्यावरण पूरक प्रवासासाठी, पायाभूत सुविधांसाठी माजी खासदार डॉक्‍टर संजीव नाईक यांनी शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबई येथे भेट घेतली. भेटीदरम्यान चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, संजीव नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईमध्ये प्रदूषण विरहित आणि पर्यावरणपूरक प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यास सहकार्य मिळत आहे. माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी पर्यावरणमंत्री जावडेकर यांची भेट घेतली होती. भेटीमध्ये जावडेकर यांनी नवी मुंबई शहरासाठी आणखी शंभर इलेक्‍ट्रिक बसेस मंजूर केल्या होत्या. यासंबंधीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी संजीव नाईक यांनी भेट घेतली. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या "फाम' योजनेअंतर्गत सध्या 30 इलेक्‍ट्रिक बसेस शहरात धावत आहेत. 100 इलेक्‍ट्रिक बसेस पुढील काही दिवसात सुरू होणार आहेत. आणखीन शंभर इलेक्‍ट्रिक बसेस या योजनेअंतर्गत प्राप्त करून देण्यात आल्या आहेत. इलेक्‍ट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास, त्यासाठी चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याची आवश्‍यकता आहे. 
चौकट 

"फाम' योजनेतून नवी मुंबईसाठी इलेक्‍ट्रिक स्टेशन्स उपलब्ध करून देण्याची तयारी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दर्शवली. चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी योग्य जागांचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना नाईक यांना केल्या आहेत. मंजूर झालेल्या नवीन 100 इलेक्‍ट्रिक बसेससह नवी मुंबईतील एकूण इलेक्‍ट्रिक बसची संख्या 300 वर जाणार आहे.

navi mumbai news Electric charging stations to be set up in Navi Mumbai soon information given by former MPs

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai news Electric charging stations to be set up in Navi Mumbai soon information given by former MPs