esakal | मन सुन्न करणारी घटना ! 11 हजार वोल्ट विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीला चिकटली लोखंडी शिडी, शिडीसोबत खेळात होता लहानगा
sakal

बोलून बातमी शोधा

मन सुन्न करणारी घटना ! 11 हजार वोल्ट विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीला चिकटली लोखंडी शिडी, शिडीसोबत खेळात होता लहानगा

हा विजेचा झटका इतका भयानक होता की, दहा मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले

मन सुन्न करणारी घटना ! 11 हजार वोल्ट विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीला चिकटली लोखंडी शिडी, शिडीसोबत खेळात होता लहानगा

sakal_logo
By
शरद वागधरे

नवी मुंबई : चार खांबाच्या लोखंडी शिडीचे टोक 11 हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह असलेल्या विद्युत वाहिनीला चिकटल्याने सदर लोखंडी शिडीसोबत खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलाला लोखंडी शिडीमध्ये उतरलेला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ऐरोली सेक्टर-8 मध्ये घडली.

हा विजेचा झटका इतका भयानक होता की, दहा मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले. या दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव गाव अद्याप समजु शकलेले नाही. त्यामुळे रबाळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृत मुलाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

ऐरोली सेक्टर-8 मधील शिवशंकर फ्लाझा या इमारतीत लेन्सकार्ट दुकान असून या दुकानाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी 25 फुटा पेक्षा उंच असलेली चार खांबाची लोखंडी शिडी उभी करण्यात आली होती. सदरची शिडी मागे पुढे ढकलता यावी यासाठी शिडीच्या चारही खांबाच्या खाली चाके लावण्यात आली होती. ऐरोली भागात सिग्नलवर फुगे व पिशव्या विकणारा 11 वर्षीय मुलगा सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्या शिडीसोबत खेळण्यासाठी गेला होता. यावेळी सदर मुलाने लोखंडी शिडी ढकलण्याचा प्रयत्न केला असता शिडीच्या टोकावरून जाणाऱ्या  11 हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह असलेल्या विद्युत वाहिनीला चिकटले. त्यामुळे लोखंडी शिडीमध्ये विद्युत प्रवाह उतरुन त्याचा शॉक सदर मुलाला लागला. 

महत्त्वाची बातमी : MMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन

हा विजेचा झटका इतका भयानक होता की, दहा मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस, अग्निशमनदल व महावितरणचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाह खंडीत करुन त्याला चिकटलेली लोखंडी शिडी बाजुला केली.

या दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या पालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले. मात्र सिग्नलवर फुगे आणि पिशव्या विकणाऱ्या लहान मुलाचा अशा पद्धतीने दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच निष्काळजीपणे लोखंडी शिडी उभी करुन ठेवणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

navi mumbai news small boy died after touching irol ladder to 11 thousand volt electric supply wire

loading image