खारघर : वणव्यामुळे वनसंपदा नष्‍ट होण्याची भीती | Navi Mumbai news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Fire

खारघर : वणव्यामुळे वनसंपदा नष्‍ट होण्याची भीती

खारघर : पाणी वाचवा, वीज वाचवा, जंगल वाचवा (save forest campaign) अशा वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. त्यासाठी पर्यावरणप्रेमी (environmentalist) जनजागृती करतात. मात्र दरवर्षी खारघर परिसरातील डोंगरात (Kharghar mountain) लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे वनसंपदा नष्ट (fire in forest) होत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

हेही वाचा: मुंबई : टाटा रुग्णालयाला घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

खारघर-सीबीडी सीमा रेषा ते खारघर ओवे डोंगर असा जवळपास सहा किलो मीटर परिसर डोंगराचा भाग आहे. पनवेल आणि ठाणे वन विभागाकडून खारघर टेकडीवर गेल्या दहा वर्षात जवळपास पंधरा हजाराहून अधिक रोप लावली आहे. तर खारघर ओवे डोंगराच्या पायथ्याशी खारघर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोप लागवड केली आहे. ही झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमी उन्हाळ्यात स्वखर्चाने पाणी देतात. काही भागात आठ ते दहा फुटापर्यंत झाडे मोठी झाली आहेत.

खारघर डोंगर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगा म्हणून ओळखल्‍या जात असल्‍याने पर्यावरणप्रेमींसह पक्षी अभ्‍यासक याठिकाणी आवर्जून भेट देतात. मात्र काही माथेफिरू आणि मद्यपी सायंकाळी फेरफटका मारण्याचा नावाने मद्यपान करताना आग लावून पसार होत असल्यामुळे वणव्यामुळे वनसंपदा नष्ट होतच आहे. शिवाय पशुपक्ष्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. सदर वन संपदा वाचविण्यासाठी आणि निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखले जाणाऱ्या खारघर डोंगर वणव्यापासून रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे.

"पनवेल विभागाकडून ज्या ठिकाणी वणवा लावला जात आहे, अशा भागातील गवत कापून जळीत पट्टा तयार केला जात आहे. नागरिकांनी डोंगर परिसरात आग न लावता वन संपदा अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करावे."

- संजय पाटील, वनपाल, पनवेल खारघर विभाग

loading image
go to top