
मुंबई - ‘खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारली जात असून, तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय तसेच संशोधनासाठी आवश्यक सुविधा असलेले ‘इनोवेशन हब’ उभारण्यात येणार आहेत. येथे क्वांटम कम्प्युटिंग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संशोधनास चालना दिली जाणार आहे.