नवी मुंबईच्या टेस्टींग लॅबचा ठाणे आणि पनवेललाही आधार; पालिकेची सुमारे पाच कोटींची बचत

नवी मुंबईच्या टेस्टींग लॅबचा ठाणे आणि पनवेललाही आधार; पालिकेची सुमारे पाच कोटींची बचत

नवी मुंबई : कोरोना रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू व्हावेत याकरीता महापालिकेने सुरू केलेली अत्याधुनिक कोव्हीड टेस्टींग लॅब एमएमआर क्षेत्रातील इतर महापालिकांनाही आधार झाली आहे. लॅब सुरू झाल्यापासून गेल्या साडे तीन महिन्यांच्या कारकिर्दीत तब्बल 50 हजार चाचण्या करण्यात लॅबला यश आले आहे. यातील काही चाचण्या शेजारच्या ठाणे आणि पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रुग्णांच्याही तपासण्यात आल्या आहेत. या भागात नवी मुंबईत एकमेव अद्यायवत लॅब असल्याने तात्काळ अहवाल उपलब्ध होण्यास मदत मिळत असल्याने शेजारच्या शहरांतील चाचण्यांचे नमूनेही तपासण्यासाठी येत आहेत.

नवी मुंबई महापालिकेने कोव्हीड 19 च्या चाचण्यांसाठी आय.सी.एम.आर. च्या परवानगी मिळविण्यापासून तपासणीसाठी आवश्‍यक सर्व यंत्रणा उभारण्यापर्यंतची कार्यवाही केवळ 11 दिवसात पूर्ण करून अदययावत आर.टी.-पी.सी.आर. लॅब विक्रमी वेळेत सुरू केली. नेरूळ येथील पालिकेच्या मीनाताई ठाकरे रूग्णालयात आर.टी.-पी.सी.आर. लॅब तयार करण्यात आली. जुलै महिन्यात सुरू झालेल्या या लॅबमध्ये 2 नोव्हेबरपर्यंत 50 हजार 363 कोव्हीड चाचण्यांचे नमूने यशस्वीरित्या तपासण्यात आले आहेत. दररोज एक हजार चाचण्या होईल इतकी मोठ्या प्रमाणावर टेस्टींग क्षमता असणारी पालिकेची ही स्वयंचलित आर.टी.-पी.सी.आर. लॅब संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील स्वयंपूर्ण व सर्वाधिक अद्ययावत लॅब आहे. या लॅबमध्ये 24 तास टेस्टींग सुरू आहे. पालिका क्षेत्राप्रमाणेच शेजारील ठाणे व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 सॅम्पल्सचीही या लॅबमध्ये टेस्टींग करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीत स्वतःच्या मालकीची लॅब नसल्यामुळे त्यांना मुंबईतील सरकारी अथवा खाजगी लॅबवर अवलंबून रहावे लागत आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीतही अशीच अवस्था असल्यामुळे शेजारीच असलेली नवी मुंबईची लॅब या दोन्ही शहरांना फायदेशीर ठरत आहे.

सुरूवातीच्या काळात कोव्हीड 19 चाचण्यांसाठी नवी मुंबई पालिकेला सरकारने नेमून दिलेल्या लॅबवर अथवा खाजगी लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. त्या लॅबवर इतरही शहरातील चाचण्यांचाही भार असल्याने रिपोर्ट मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. ही परिस्थिती लक्षात घेत दोनच दिवसात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 16 जुलैला अर्ध्या तासात चाचणी अहवाल मिळणा-या रॅपीड अँटिजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला.
आवश्‍यक टेस्ट्‌सच्या वाढीसाठी अँटिजेन टेस्ट सोबतच पालिकेची स्वत:ची आर.टी.-पी.सी.आर. लॅब सुरू करण्याकडे विशेष लक्ष दिले.

भविष्यातही फायद्याची
सध्या या लॅबमध्ये कोव्हीड 19 संबंधित टेस्ट्‌स करण्यात येत असल्या, तरी "मॉलिक्‍युलर डायग्नोसिस' स्वरूपाच्या या सुसज्ज लॅबमध्ये भविष्यात स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरेसीस, एच.आय.व्ही.अशा इन्फेक्‍शन डिसीजेससह अगदी कर्करोगाच्या टेस्ट्‌सही होऊ शकतील. कोव्हीडच्या एका टेस्टला खाजगी लॅबमध्ये येणा-या खर्चाशी या लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी महानगरपालिकेला येणा-या खर्चाशी तुलना केली असता, या लॅबच्या क्षमतेनुसार सुरू झाल्यापासून एक महिन्यांच्या आतच लॅब उभारणीसाठी महापालिकेला आलेल्या भांडवली खर्चाच्या रक्कमेची बचत झालेली आहे.

Navi Mumbais testing lab also supports Thane and Panvel Municipal Corporation saves about five crores 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com