फेसबुकवर लाईव्ह केलं, लाइव्हमध्ये पंख्याला बांधली नायलॉनची दोरी आणि...

सुमित बागुल
Friday, 7 August 2020

सदर तरुण पालघरमधील जव्हार शहरात राम मंदिराशेजारील एका इमारतीत राहतो. नवनाथ एका हॉटेलमध्ये वेटरम्हणून काम करायचा

पालघर : भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक आठवतेय का ? आपल्या आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक लाईव्ह करत, माझी मोठी फसवणूक झाल्याचं सांगत दुसऱ्या दिवशी तिने स्वतःला संपवत आत्महत्या केलेली. अभिनेत्री अनुपमा पाठकच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ माजली होती. आता अशीच एक घटना आता पालघरमध्ये घडली आहे आणि या घटनेने सर्वांनाच मोठा शॉक बसलाय. 

नवनाथ बोगे. वय अवघे २२ वर्ष. फेसबुकवर स्वतःचा व्हिडीओ लाईव्ह केला आणि केली आत्महत्या. ही धक्कादायक घटना घडलीये पालघरमधील जव्हारमध्ये. काल संध्याकाळी नवनाथ बोगे नामक तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत आत्महत्या केलीये. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजलीये. 

Unlock 3.0: नवी मुंबईपालिकेचा यू-टर्न, घेतला 'हा' मोठा निर्णय

सदर तरुण पालघरमधील जव्हार शहरात राम मंदिराशेजारील एका इमारतीत राहतो. नवनाथ एका हॉटेलमध्ये वेटरम्हणून काम करायचा आणि हॉटेल मालकाच्याच फ्लॅटमध्ये राहत असे. काल संध्याकाळी  स्वतःच्या फेसबुलवरून लाईव्ह व्हिडीओ सुरु केला. लाईव्ह व्हिडिओमध्ये तो आपल्या काही मित्रांशी देखील बोलल्याचं समजतंय. बोलता बोलता त्याने पंख्याला एक नायलॉनची दोरी बांधली आणि स्वतःला संपवत आत्महत्या केली. सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ माजलीआहे. 

नवनाथ हा अवघ्या २२ वर्षांचा तरुण. त्याने आत्महत्या कशाला केली? तो कोणत्या तणावात होता का ? कुणी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं का याबाबत पोलिस तपास करतीलच. नवनाथच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही गुलदस्तायत आहे. या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

navnath boge youngster from palghar finished his life in facebook live session with friend


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navnath boge youngster from palghar finished his life in facebook live session with friend