esakal | काय सांगता! नवरदेव थेट पीपीई कीट घालून बोहल्यावर, कुठे झालाय हा विवाह
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! नवरदेव थेट पीपीई कीट घालून बोहल्यावर, कुठे झालाय हा विवाह

विवाह सोहळा म्हंटल की नवरदेव सुटबुटात बोहल्यावर उभा राहतो, मात्र नालासोपाऱ्यात नवरदेव चक्क पीपीई किट घालून सज्ज झाला होता. अगदी साध्या पध्दतीने लग्न करतांना कोरोना संसर्गाची खबरदारी लक्षात घेत सर्व नियमाचे पालन यावेळी करण्यात आले होते.

काय सांगता! नवरदेव थेट पीपीई कीट घालून बोहल्यावर, कुठे झालाय हा विवाह

sakal_logo
By
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा


वसई : विवाह सोहळा म्हंटल की नवरदेव सुटबुटात बोहल्यावर उभा राहतो, मात्र नालासोपाऱ्यात नवरदेव चक्क पीपीई किट घालून सज्ज झाला होता. अगदी साध्या पध्दतीने लग्न करतांना कोरोना संसर्गाची खबरदारी लक्षात घेत सर्व नियमाचे पालन यावेळी करण्यात आले होते.

मंत्रालयातले कर्मचारीच भाजपला माहिती पुरवतात; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप...

नालासोपारा पूर्वेकडे राहणारा 27 वर्षीय संजय गुप्ता आणि बबिता गुप्ता यांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरले. दरम्यान लॉकडाऊन असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली, परंतु यावर दोन्ही पक्षांनी तोडगा काढला. केवळ मर्यादित लग्नाचे निमंत्रण देत आळस सामाजिक दुरी,  मास्क यासह अन्य नियम पाळण्याचे ठरले. विवाह सोहळ्यात नावरदेवाने सुरक्षेची पूर्ण काळजी घेता यावी म्हणून पीपीई किट घातला. नववधूने देखील तोंडावर मास्क, शिल्ड लावले होते. या विवाह सोहळ्यात केवळ 25 ते 30 जणांची उपस्थिती होती. कोरोना असल्याने घरीच लग्न उरकले कोरोनाचा पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली असे नवरदेव संजय गुप्ता यांनी सांगितले.

loading image
go to top