नौसैनिकानेच सहकाऱ्याच्या पत्नीवर केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

नौसैनिकानेच सहकाऱ्याच्या पत्नीवर केला बलात्कार

मुंबईः नौसैनिकाच्या (Navy person) २९ वर्षीय पत्नीवर बलात्कार (rape) केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी एका नौसैनिकाला अटक केली. तक्रारदार महिलेचा पती पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी कोचीला गेला होता. त्याचा फायदा उचलून आरोपीने हे दुष्कृत्य केले. (Navy person rape on friends wife)

अटक करण्यात आलेला 35 वर्षीय नौसैनिकाचे कुटुंब त्याच्या गावी वास्तव्याला आहे. तक्रारदार व आरोपी यांचे कुटुंब नौदलाच्या क्वार्टर्समध्ये एकाच खोलीत शेअरिंगमध्ये राहतात. 23 एप्रिलला तक्रारदार महिलेचा पती कोचीला प्रशिक्षणासाठी गेला होता. त्याचा फायदा उचलून आरोपीने 29 एप्रिलला आजारी असलेल्या तक्रारदार महिलेवर जबरदस्ती केली. त्यावेळी त्याच्या तावडीतून सुटलेल्या तक्रारदार महिलने स्वतःचा हात शिवणकाम करणा-या ब्लेटने कापून घेतला.

त्यानंतर आरोपी तेथून गेल्यानंतर महिलेने पतीला दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पती आल्यानंतर महिलेने याप्रकरणी कफ परेड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

loading image
go to top