गँगस्टर सोनू पठाणच्या एनसीबीने आवळल्या मुसक्या

Gangster
Gangstersakal media

मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाला (NCB) सातत्याने गुंगारा देणाऱ्या गँगस्टर सोनू पठाणच्या (Gangster Sonu Pathan) अखेर मुसक्या आवळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात (Mumbai Dongari) असलेल्या ड्रग फॅक्टरीच्या (Drug Factory) संबंधात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सोनूला हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स (Summons) पाठविले होते, मात्र, तो एनसीबी अधिकाऱ्यांना फसवीत असल्याचे समोर आले. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जामन हिदायतुल्ला खान उर्फ सोनू पठाण याला एनसीबीच्या पथकाने पायधोनी भागात पहाटे अटक (NCB Action) केली. तो सध्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (NCB Arrested gangster sonu pathan in Drug case)

Gangster
पुरेसा निधीच मिळाला नाही त्यामुळे हॉस्पिटलने निवडला बोगस लसींचा मार्ग!

संबंधित अधिकारी म्हणाले की, एनसीबीने पठाणला चौकशीला हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावला होता. परंतु त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. पठाण एका मैत्रिनीला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजन्सीने त्या भागात छापा टाकून त्याला अटक केली. याआधीही एजन्सीने या प्रकरणात चिंकू पठाण उर्फ परवेझ खान आणि फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि दिवंगत माफिया डॉन करीम लालाचा नातेवाईक आरिफ भुजवाला यांना अटक केली होती. जानेवारीमध्ये झालेल्या कारवाईत एनसीबीने 5.375 किलो मेफेड्रोन (एमडी), 6.126 किलो एफेड्रिन, 990 ग्रॅम मेथाम्फॅटामिन, 2 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि दोन शस्त्रे जप्त केली होती. तर याचा अधिक तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com