Breaking | मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला NCBकडून अटक

Breaking | मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला NCBकडून अटक

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाची केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) बुधवारी अटक केली. 200 किलो गांजा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत झालेल्या संशयीत व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. 13तासांच्या चौकशीनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली.

समीर खान असे नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव आहे. समीर खान यांना एनसीबीने चौकशीसाठीसमन्स पाठविले होते. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी व समीर यांच्यात जीपेद्वारे आलेले 20 हजार रुपयाचा व्यवहार झाला.  त्या च्या पडताळणीसाठी  एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवले. त्यानुसार समीर खान आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिले होते. एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शनिवारी एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता.` त्याचप्रकरणी चौकशीदरम्यान बऱ्याच जणांची नावे समोर आली होती. सजनानीच्या खात्यातील एका संशयीत व्यवहाराबाबत चौकशीत समीर खान यांच नाव असल्याचं उघड झाले.  त्यामुळे मंगळवारी (12 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्रे येथे जाऊन समीर खान यांना समन्स देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार समीर खान बुधवारी सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांची सुमारे 13 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

मुच्छड पानवाल्याला जामीन
दरम्यान याच प्रकरणी एनसीबीने मुंबईतील मुच्छड पानवालामधील रामकुमार तिवारीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याची बुधवारी सुटका केली.

NCB arrests Nawab Maliks son in law

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com