दीपिकाची चौकशी करणाऱ्या NCBच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

अनिश पाटील
Sunday, 4 October 2020

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई ः बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चौकशीवेळी मल्होत्रा तेथे उपस्थित होते. 

'सुशांतप्रकरणी शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे तोंडावर आपटले'; शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया

दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश, अभिनेत्री रकुलप्रीत व टॅलेंट मॅनेजर जया साहा यांच्या चौकशीवेळीही मल्होत्रा तेथे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. करिष्मा प्रकाशसोबत 201 मध्ये झालेल्या चॅटवरून एनसीबीने दीपिकाची पाच तास चौकशी केली होती. त्या वेळी दीपिकाने 2017 मधील हे चॅट आपलेच असल्याचे मान्य केले; मात्र ड्रग्स सेवनाच्या आरोपांना नकार दिला. त्यात माल व हॅश हे सिगारेटसाठी सांकेतिक शब्द असल्याचे तिने स्पष्ट केले. एनसीबीने याप्रकरणी तिचा मोबाईल जप्त केला असून, डेटा क्‍लोनिंगच्या माध्यमातून जुन्या सर्व फाईल्स मिळवण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या बॅंक खात्याची गेल्या तीन वर्षांतील व्यवहार तसेच इतर व्यवहारांची तपासणी करण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे. 

कशासाठी पोटासाठी! आदिवासी महिलांकडून महामार्गावर रानभाज्या, फळभाज्यांची विक्री

या प्रकरणात अमली पदार्थांच्या रॅकेटच्या बाजूनेही तपास करणाऱ्या एनसीबीला महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे रिया व तिचा भाऊ शौविक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ड्रग्ज प्रकरणात रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्‍टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली. 

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB officer interrogating Deepika infected corona