esakal | Drug case: राष्ट्रवादीने केलेले आरोप NCB ने फेटाळले
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

Drug case: राष्ट्रवादीने केलेले आरोप NCB ने फेटाळले

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: NCB ने शनिवारी मुंबई जवळ क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर (Rave party) कारवाई केली. त्यांनी पार्टीमधून सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan khan) अटक केली. या प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपाशी संबंधित असलेला मनीष भानुशाली हा व्यक्ती एनसीबी सोबत कारवाईमध्ये सहभागी झाला होता. भाजपशी संबंधित असलेला व्यक्ती NCB सोबत कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. छापेमारीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

त्यावर आता एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. विशेष टीप मिळाली होती. त्या आधारावर एनसीबी मुंबई टीमने क्रूझवर छापा मारला. आठ जणांना ताब्यात घेतलं. अरबाज मर्चंट, आर्यन खान, मुनमुन धमेचा यांना विविध ड्रग्ज सोबत ताब्यात घेण्यात आलं. मोहक जयस्वालच्या माहितीनंतर जोगेश्वरीतून अब्दुल शेखला ताब्यात घेतलं, अशी माहिती आज एनसीबीने पत्रकार परिषदेत दिली. एकूणच अटक आणि कारवाईच्या सर्व घटनाक्रमाची माहिती एनसीबीने दिली.

हेही वाचा: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'

पण गोस्वामी आणि मनीष भानुशाली हे भाजपाशी संबंधित असलेले दोन व्यक्ती एनसीबीच्या कारवाईत कसे सहभागी झाले, या बद्दल थेट उत्तर देण्याचे टाळले. पंचनाम्याचे साक्षीदार म्हणून दोघेही तिथे होते. कायद्यात तशी तरतूद आहे, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. आमच्यावर करण्यात आलेल आरोप निराधार आहेत. सर्व प्रक्रियाचे पालन करुन कारवाई केली आहे, असे एनसीबीने आज पत्रकार परिषदेत सांगितले.

loading image
go to top