'बघा रे याला' असं म्हणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'बघा रे याला' असं म्हणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकेत

बेकायदेशीरपणे रास्ता रोको करीत असतांना अटकाव केला म्हणून पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुकी करणाऱ्या दिवा शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकाऱ्यांना अटक

'बघा रे याला' असं म्हणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकेत


ठाणे : बेकायदेशीरपणे रास्ता रोको करीत असतांना अटकाव केला म्हणून पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुकी करणाऱ्या दिवा शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा शहर चिटणीस मनोज कोकणे याच्यासह 8 ते 10 जणांवर शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली MIDC तील 'ड्रीमलॅंड' रासायनिक कंपनीला आग; मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज

निलेश कापडणे नामक तरुणास काही जणांनी मारहाण केली होती. कापडणे यास मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करा अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा शहर चिटणीस मनोज कोकणे यांच्यासह 20 ते 25 लोकांनी शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बेकायदेशीरपणे रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले व त्यांनी या रास्ता रोको आंदोलनास अटकाव केला.

या गोष्टीचा राग येऊन मनोज कोकणे याने 'हा सरडे असाच बोलतो, बघा रे याला' अशी जमावाला चितावणी दिली. तसेच कोकणे सोबत असलेल्या इतरांनी सरडे व पोलिसांना घेराव घालून धक्काबुकी केली. तर कोकणे याने त्याच्या हातातील छत्रीने पोलीस उपनिरीक्षक सरडे यांच्या डोक्यावर मारले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे कोकणे याच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मनोज विष्णू कोकणे (42), विषय विठ्ठल वाघ (28), सूर्यकांत आत्माराम कदम (47), हिमांशू सूर्यकांत कदम (20), राहुल शिंदे (20) आदींना अटक केली.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top