शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

मुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात अनुभवी आणि जेष्ठ नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार. राजकारणात शरद पवारांएवढा कुणालाच काळात नाही असं बोललं जातं. गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि संजय राऊत या नेत्यांमुळे महाराष्ट्रातील सत्तागणित पालटून टाकलं.

अशातच सध्या चर्चा आहे ती शरद पवारांच्या संपत्तीची. याला कारणही तसंच आहे. शरद पवार यांना नुकतीच आयकर विभागाकडून एक नोटीस आलीये. या नोटिशीत शरद पवार यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यामधील काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आलीये. शरद पवार लवकरच या नोटिशीला उत्तर देणार आहेत. स्वतः शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिलीये.

मात्र या सर्वात आपल्या सर्वांना एक उत्सुकता कायम असते ती म्हणजे सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, किंवा शरद पवार यांची संपत्ती असेल तरी किती. या लेखातून आम्ही तुम्हाला शरद पवारांची किती संपत्ती आहे याबाबत सांगणार आहोत.  

जाणून घेऊयात शरद पवारांच्या संपत्तीबाबत :

स्थावर मालमत्ता : 

  • 1 कोटी 30 लाख 97 हजार 960 रुपयांच्या शेतजमिनी 
  • 91 लाख 71 हजार 480 रुपयांची बिगरशेती जमीन आहे.
  • 3 कोटी 12 लाख 50 हजार रुपये मालकीची व्यावसायिक इमारत 
  • 2 कोटी 17 लाख 14 हजार 501 रुपये मालकीची रहिवासी इमारत 

जंगम मालमत्ता : 

  • बँकेत विविध स्वरूपात 9 कोटी 39 लाख 93 हजार 386 रुपये त्याचबरोबर 65,680 रुपये रोकड
  • शेअर्स आणि बॉण्ड्सच्या स्वरूपात गुंतवलेली रक्कम : 7 कोटी 46 लाख 24 हजार 449 रुपये 
  • 88 लाख 65 हजार 805 रुपयांचे दागिने 

कर्ज स्वरूपात दिलेली रक्कम : 

  • शरद पवारांनी 7 कोटी 45 लाख 84 हजार रुपये एवढे वैयक्तिक कर्ज दिलंय 

कर्ज म्हणून असलेली रक्कम : 

  • शरद पवारांवर 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातील 50 लाख रुपये शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये पार्थ पवार यांच्याकडून घेतले आहेत.

शरद पवार यांच्या नावावर एकही गाडी नाही 

सदर माहिती ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स या निवडणुकांसंदर्भातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिलेली आहे. नुकत्याच राज्यसभेसाठी जेंव्हा शरद पवार यांनी अर्ज दाखल केलेला. तेंव्हा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलेली. सदर संपत्ती शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर आहे.

NCP chief sharad pawars property details as submitted to EC before rajyasabha election

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com