Jayant Patil : 'भावी मुख्यमंत्री जयंत पाटील'; मुंबईतल्या बॅनर्सची राज्यभर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil
Jayant Patil : 'भावी मुख्यमंत्री जयंत पाटील'; मुंबईतल्या बॅनर्सची राज्यभर चर्चा

Jayant Patil : 'भावी मुख्यमंत्री जयंत पाटील'; मुंबईतल्या बॅनर्सची राज्यभर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. काय आहे या बॅनरमध्ये?

मुंबईतल्या या बॅनर्सवर जयंत पाटलांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

या पोस्टर्सवर बॉस, माझं दैवत असाही उल्लेख करण्यात आला आहे. तसंच यावर संतोष पवार आणि हितेंद्र सावंत या दोन पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भावनिक कार्यकर्ते काय करतील ते सांगता येत नाही. उगाच कुणी तरी बोर्ड लावला तर आपण चर्चा करू नये, असं म्हणत रोहित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याची विनंती केली आहे.