धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्माने उचललं मोठं पाऊल

पूजा विचारे
Friday, 22 January 2021

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं तक्रार मागे घेतली आहे.

मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं तक्रार मागे घेतली आहे.  गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. 

रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे.  त्यामुळे तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. 

योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० तारखेला धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आपलं वकीलपत्र मागे घेतलं होतं. त्यामुळे आपलं या केसशी आता काही संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दोन दिवसांपूर्वी वकिलांनी वकीलपत्र मागे घेतलं तर काल रेणू शर्मा यांनी देखील आपली तक्रार मागे घेण्यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

स्वत:  धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलास केला होता. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचं देखील सांगितलं. पहिल्या पत्नीपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं होतं. 

दरम्यान रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

पीडितेच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती, तर धनंजय मुंडेंविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे.

ncp leader Dhananjay Munde case Complaint back from singer Renu Sharma


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader Dhananjay Munde case Complaint back from singer Renu Sharma