महाविकास आघाडीचा खातेवाटप फॉर्म्युला ठरला..

महाविकास आघाडीचा खातेवाटप फॉर्म्युला ठरला..

महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. उद्या मुख्यमंत्री आणि तीनीही पक्षांचे काही मंत्री शपथ घेणार आहेत. कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार हे आज रात्री ठरवलं जाणार आहे. याबद्दलची माहिती  राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे; उपमुख्यामंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे जाणार आहे. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टता दिली आहे.  

राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना तीन डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये अन्य मंत्रिमंडळं आणि इतर महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात येईल.

आज तीनही पक्षांची अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. आता उद्या सकाळपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमके कोणते नेते शपथ घेणार हे अजून स्पष्ट झालेलं पहालाया मिळू शकेल.

उद्या उद्धव ठाकरे संध्याकाळी 6.40 वाजता दादरमध्ये शिवाजीपार्कवर  मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.    

Web Title :  NCP leader prafull patel brief media about cabinet details of mahavikas aaghadi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com