'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण

तुषार सोनवणे
Sunday, 27 September 2020

राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेना एकटी सरकार चालवत नसल्याची आठवण करून दिली आहे.

मुंबई - शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. यावर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, राज्यातील बड्या नेत्यांच्या या भेटीवर ्प्रतिक्रीया येणं सहाजिक आहे. या भेटीवर राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेना एकटी सरकार चालवत नसल्याची आठवण करून दिली आहे.

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका

खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट दै. सामानाच्या मुलाखतीसाठी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी, माध्यमं आणि राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्कांना उधान आलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला या भेटीमुळे काही फरक पडणार नाही, सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही. हे सरकार शिवसेना एकटी चालवत नसून, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षही त्यांच्या सोबत असल्याची आठवण राष्ट्रवादीचे जेष्ट नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीत समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरही महिला प्रवाशांसाठी विशेष लोकल सुरु करा, महिला प्रवाशांची मागणी

संजय राऊत नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत असतात. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख जेवढे माध्यमांमध्ये चर्चेत नसतात तेवढे राऊत असतात असाही मार्मिक टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The NCP leader reminded that Shiv Sena is not alone in the Mahavikasaghadi government